विविधतेतून एकतेचा संदेश! जि. प. शाळा शहापूर व बाम्हणे येथे समावेशीत शिक्षण उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी निमित्ताने ‘बालदिंडी’ उत्साहात
1 min read

विविधतेतून एकतेचा संदेश! जि. प. शाळा शहापूर व बाम्हणे येथे समावेशीत शिक्षण उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी निमित्ताने ‘बालदिंडी’ उत्साहात

Loading

विविधतेतून एकतेचा संदेश! जि. प. शाळा शहापूर व बाम्हणे येथे समावेशीत शिक्षण उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी निमित्ताने ‘बालदिंडी’ उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा शहापूर व बाम्हणे येथे ‘समावेशीत शिक्षण’ उपक्रमाअंतर्गत भव्य बालदिंडी व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. सामान्य विद्यार्थ्यांसोबत विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांनी या दिंडीत हिरीरीने भाग घेऊन “विठू माऊली”च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
समावेशीत शिक्षणाचा मूळ उद्देश समाजात समरसता निर्माण करणे आणि प्रत्येक बालकाला मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. हाच आदर्श घालत शहापूर व बाम्हणे येथील विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी आणि विविध संतांची मनमोहक रूपे साकारली होती.
टाळ-मृदुंगाचा गजर, हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनींमुळे दिंडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीच्या मार्गात विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, फुगडी आणि भजनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीमुळे ‘बंधुभाव व समानतेचे’ सुंदर चित्र पाहायला मिळाले.
*या सोहळ्यास केंद्रप्रमुख श्री. अशोक सोनवणे,विशेष शिक्षक श्री. किशोर पाटील, मुख्याध्यापक श्री. संजय पाटील व श्री. नंदलाल पाटील, शिक्षक श्रीमती दिपाली बुवा, श्रीमती पूनम साळुंखे, श्री. यादवराव परदेशी, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया पाटील, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे (SMC) अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *