अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण , मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत
1 min read

अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण , मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत

Loading

अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील एस. टी. आगारात अत्याधुनिक पध्दतीच्या 5 नवीन बसेस दाखल झाल्या असुन
माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या बसचे पूजन होऊन उदघाटन करण्यात आले.
अशोक लेलंड कंपनीच्या असलेल्या सदर बसेस 3 बाय 2 आसनाच्या असून यात 52 सीट्स आहेत. तसेच मोबाईल चार्जर,आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, माईक,बॅक कॅमेरा आदी सुविधा यात असून बसला एअर सस्पेंशन व बसचे मॉडेल बी एस 6 प्रकारचे आहे.याशिवाय अजून 5 नवीन बसेस ची मागणी अमळनेर आगाराने केली असून यासाठी आमदार अनिल पाटील हे प्रयत्नशील आहेत.आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने याआधी देखील 5 बसेस अमळनेर आगरास मिळाल्या होत्या.आता अमळनेर आगारात एकूण बसेस ची संख्या 75 झाली आहे.

आमदारांनी केली बस सवारी

बसचे पूजन झाल्यानंतर आमदार अनिल पाटील हे स्वतः कार्यकर्ते व अधिकारी वर्गासोबत बसमध्ये विराजमान होऊन गावात सवारी करण्यात आली.

पंढरपूर फेरीला मिळतोय प्रतिसाद

सध्या पंढरपूर येथे विठ्ठल रुखमाईचा आषाढी महोत्सव सुरू असल्याने एस टी ला अनेकांची पसंती मिळत असून दररोज 3 ते 4 बसेस जात आहेत.ग्रामिण भागात 40 ते 42 प्रवासी असल्यास त्यांना स्वतंत्र बस दिली जात असून या बसमध्ये सर्व प्रकारच्या सवलती मिळत आहेत.याशिवाय एकूण 12 बसेस पंढरपूर यात्रेसाठी इतर आगाराना देण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.
सदर उद्घाटन प्रसंगी कामगार नेते एल टी पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत,शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील,पत्रकार किरण पाटील,एस टी मोरे,गौरव पाटील,आगार व्यवस्थापक राकेश शिवदे,कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर,वाहतूक निरीक्षक
मुकेश सैदाने,वरिष्ठ लिपिक तुषार पाटील,अकाऊंटंट
अमोल पाटील यासह कार्यकर्ते व एस टी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *