अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन
![]()
अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
, दि.25 जुलै : संत श्री सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांच्या स्वागता साठी फलक झळकले असून. या निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. 25 जुलै 2026 शनिवारी, रोजी सकाळी 8.00 ते 6.00 रक्तदान शिबीर तर दु 4.00 ते 6.00 आरोग्य तपासणी शिबीर
भक्त निवास,वाडी संस्थान अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.आरोग्य निदान डॉ सुमित सूर्यवंशी,डॉ जितेंद्र बिऱ्हाडे,डॉ सोनल महाजन, डॉ निलेश शिंगाणे या विविध आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी करून दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमासाठी जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत असून, अध्यक्ष डॉ. महेश रमण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

