स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन
1 min read

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन

Loading

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, अमळनेर येथे स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत समाजहितासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहिली.

कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी यांचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने जपावा आणि नव्या पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या प्रसंगी अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ,  संयुक्त चिटणीस सुमित कुलकर्णी तसेच ग्रंथालयातील वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रम शांत, साधेपणाने आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा समाजात कायम जिवंत राहावा, अशी भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *