हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना  ,बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना
1 min read

हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना ,बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना

Loading

‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना

बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना!

शोभायात्रेत ‘हर हर महादेव’चा जयघोष; असंख्य भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी

बोरी नदीच्या मध्यभागी वसलेले सुमारे २०० वर्षे जुने पाताळेश्वर महादेव मंदिर येथे ४१ फुटी भव्य त्रिशूलाची मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. यानिमित्त फर्ची रोड येथील मारोती मंदिरापासून पाताळेश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. डीजेच्या तालावर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हा भव्य त्रिशूल ज्ञानेश्वर रामा लोहार, रा. पैलाड, अमळनेर यांच्या वतीने सेवाभावी भावनेतून पाताळेश्वर महादेव मंदिरास अर्पण करण्यात आला. त्रिशूल स्थापनेच्या कार्यक्रमाला असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती लाभली. पैलाड, वाडी चौक, भोईवाडा तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली.
या धार्मिक उपक्रमासाठी प्रसाद माऊली ग्रुप आणि शिवशक्ती साउंड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सुभाष मामा पाटील, गुलाब बापू गुरव, संदीप शिंगणे, सोनू भोई, हर्षल भोई, रमेश भोई, सुनील कोळी, दिलीप कोळी आणि विजय भाऊ पाटील यांचे मंदिरासाठी वेळोवेळी लाइटिंग व अन्य स्वरूपात सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले. ४१ फुटी त्रिशूलाच्या स्थापनेने पाताळेश्वर मंदिराच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *