खवशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी रणधुमाळी; इच्छुकांची भाऊगर्दी, गावच्या राजकारणाला वेग , अमळनेर तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही; खवशीत सर्वसाधारण सरपंचपदासाठी मातब्बरांमध्ये चुरशीची लढत, प्रशासक राज संपण्याच्या प्रतीक्षेत गावकऱ्यांची उत्सुकता.
![]()
खवशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी रणधुमाळी; इच्छुकांची भाऊगर्दी, गावच्या राजकारणाला वेग
अमळनेर तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही; खवशीत सर्वसाधारण सरपंचपदासाठी मातब्बरांमध्ये चुरशीची लढत, प्रशासक राज संपण्याच्या प्रतीक्षेत गावकऱ्यांची उत्सुकता.
अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)
गेल्या कित्येक महिन्यापासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना कधीही लागण्याची शक्यता असल्याकारणामुळे गाव गाड्याच्या राजकारणाची चर्चा गाव कट्टा आणि चौका चौकात रंगू लागली आहे. नुकत्याच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लागण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भावी पदाधिकाऱ्यांच्या मनात चलबिचल होताना दिसत आहे. बऱ्याच दिवसापासून खेडे ..गाव.. वस्ती वस्तीवरील ग्रामपंचायत प्रशासक राज असल्याने विकासावर बराचसा परिणाम झालेला दिसत आहे.
अमळनेर तालुक्यातील जवळपास ८० ग्रामपंचायतीवर प्रशासक राज असल्याने या ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू झालेली आहे. या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाच्या विषय अगोदरच निकाली निघालेला आहे. तसेच अंतिम मतदार यादी पूर्णपणे जाहीर झालेली आहे. अंतिम मतदार यादीच्या प्रारूप आराखडा तयार झालेला असून तो लवकरच प्रसिद्धी झाल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. पण ग्रामीण भागातील “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाव गाडा ओढण्यासाठी गावाचा “कारभारी” असणे गरजेचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी कंबर कसलेले दिसत आहे.
अमळनेर तालुक्यातील ८० ग्रामपंचायत मध्ये खवशी ग्रामपंचायतच्या देखील समावेश आहे. गावाच्या ग्रामपंचायतची वार्ड रचना जाहीर करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायतचे सरपंच पद हे सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असून वार्डरचना पुढील प्रमाणे आहे .वार्ड क्रमांक १ एक मध्ये ४१२मतदार असून २जागा राखीव आहेत त्यात १) अनुसूचित जाती महिला राखीव २) नामाप्र महिला राखीव, वार्ड क्रमांक २ मध्ये ५६० मतदार असून ३ सदस्य जागा आहेत त्यात १ )अनुसूचित जमाती महिला राखीव २)सर्वसाधारण पुरुष/ महिला३) ओबीसी महिला राखीव, वार्ड क्रमांक ३ मध्ये ३६९ मतदार असून या वार्डात २ जागा राखीव आहेत.१) सर्वसाधारण २) नामाप्र महिला, वरील प्रमाणे आरक्षण जाहीर झालेले आहे.
या पंचवार्षिकला सरपंच पद लोकनियुक्त मधून निवडले जात असल्याने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सरपंच पद सर्वसाधारण साठी खुले असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढताना दिसत आहे. यात गावाचे माजी सरपंच आणि परिसरातील प्रगतिशील शेतकरी डॉ.श्यामकांत देशमुख, तसेच गावाचे माजी उपसरपंच आणि मात्र सध्या शिरपूर येथे स्थायिक असलेले आमदार अमरीश भाई पटेल यांचे खंदे समर्थक अनिल भास्कर पाटील यांची पण दावेदारी आहे. तसेच मावळत्या सरपंच आणि प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या सरपंच सौ आशाताई अरुण गोसावी यांचे पती अरुण भगवान पुरी गोसावी हे सुद्धा यासाठी इच्छुक आहेत. तसेच अमळनेर नगरीतील प्रख्यात हॉटेल पाटील वाडा चे संचालक सचिन गुणवंत पाटील हे देखील यासाठी इच्छुक आहेत. तसेच अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांचे खंदे समर्थक विशाल गजानन सूर्यवंशी आणि शिवाय ऑप्टिकल चोपडाचे संचालक राहुल शंकर मराठे हे देखील स्पर्धेच्या रिंगणात आहेत. व अजूनही इच्छुकांची नावे वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता सरपंच पदासाठी मोठी चुरस पहायला मिळत आहे. तरी या निवडणुकीत वरील सर्व मातब्बरांची प्रतिष्ठा पनाला लागली असून या मातबरांमध्ये विजय गुलाल कुणावर उधळला जातो हे पाणी औचित्याचे ठरेल.

