स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात शाखा उदघाटनाचा शुभारंभ , राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण
![]()
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात शाखा उदघाटनाचा शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण
अमळनेर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात 22 जुलै पासून ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत प्रतिमेस पुष्पार्पण,महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण तसेच गाव आणि प्रभाग तेथे राष्ट्रवादीची शाखा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार आणि जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, अमळनेर येथे सकाळी ठीक 10.10 वाजता स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला आमदार अनिल पाटील,माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्व.अजितदादा पवार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
त्यानंतर स्वर्गीय अजित दादा यांना संघटन वाढीची अनोखी श्रद्धांजली म्हणून अमळनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे उदघाटन तथा फलक अनावरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आर के नगर,पिंपळे रोड,ढेकू रोड,मिलचाळ,तांबेपुरा, गांधलीपुरा,कुंटे रोड,माळीवाडा व पैलाड आदी भागात राष्ट्रवादी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.टप्प्याटप्प्याने शहर व ग्रामिण भागात प्रत्येक प्रभाग व ग्रामिण भागात प्रत्येक गावात शाखा उद्घाटन करण्यात येणार आहे.
तर सायंकाळी छत्रपती शिवराय, पूज्य सानेगुरुजी,नेताजी सुभाषचंद्र बोस,डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले.त्यानंतर अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघात आमदारांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शेतकी संघाच्या वतीने ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. ,
दिनांक 28 जुलै पर्यंत जनसेवा सप्ताह असल्याने यादरम्यान रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमास राष्ट्रवादीचे शहर व ग्रामिण पदाधिकारी, अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व फ्रंटल सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष तसेच सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, शेतकी संघ व बाजार समिती प्रेसिडेंट, व्हॉईस प्रेसिडेंट, संचालक मंडळ, आजी माजी नगरसेवक, जि. प. व प. स. चे माजी पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


