जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी,  स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
1 min read

जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी, स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Loading

जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी

स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे ता. अमळनेर येथे लोकनेते स्व. अजित दादा पवार यांची जयंती साजरा करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष डी एम पाटील सर यांनी दादांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी सरांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, अमळनेर विधानसभेचे तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील यांनी आयोजित केलेल्या अमळनेर तालुक्याच्या विकास कामांच्या व बोरी नदीवरील पुलाच्या भूमिपूजनासाठी स्व. अजितदादा धुळ्यावरून अमळनेर येत असताना २२ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या गावाला आले होते. तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील यांच्या कृपाआशीर्वादाने आपल्या विठ्ठलमंदिर सभागृह व वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन स्व. दादांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. त्यावेळी दादांचा चरणस्पर्श आपल्या गावाला झाला ते आपण जानवेकर कधीही विसरू शकणार नाहीत . दादा हे राजकारणा पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास घेणारे लोकनेते होते. प्रशासकीय शिस्त, तत्पर कार्यक्षमता, आणि अहोरात्र जनसेवा हीच त्यांची खरी ओळख होती महाराष्ट्राच्या अशा अभ्यासू कर्तुत्ववान व कणखर नेतृत्वाला आपण पारखे झाले आहोत. दादांच्या जाण्यामुळे पवार परिवाराचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय दृष्ट्या खूप मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही असा हा राजकारणातला “दादा माणूस” लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना जानवे गावाच्या वतीने व अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तालुकाध्यक्ष या नात्याने तालुक्यातील पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू -भगिनी यांच्यावतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो
या कार्यक्रम प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा रामदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते पितांबर बुधा पाटील, रमेश महादू पाटील, दौलत नगराज पाटील, सुखदेव देवराव पाटील, विजय साहेबराव पाटील, प्रीतम मधुकर पाटील, हिंमत सदा पाटील, पंकज भामरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *