रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ  सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण
1 min read

रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण

Loading

रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण

अमळनेर प्रतिनिधी : रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने रोटरी हॉल, पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम शाळा परिसरात भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अमळनेर शहरासह परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा सुंदर आविष्कार सादर केला.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रख्यात चित्रकार व शिल्पकार प्रल्हाद सोनार (शिरपूर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रकला ही केवळ छंद नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. सर्जनशील विचार, कल्पनाशक्ती आणि सामाजिक भान जपणाऱ्या कलाकृती घडविण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
इयत्तेनुसार विविध विषय देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रंगसंगती, कल्पकता आणि सामाजिक जाणीवेचे उत्कृष्ट दर्शन घडविणारी आकर्षक चित्रे साकारली. परीक्षकांनी चित्रांचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली.
या उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन Rtn. देवांग शाह आणि Rtn. डॉ. शरद बाविस्कर यांनी संपूर्ण नियोजन यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पालवे सर यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष Rtn. महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे बालकांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते व त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. तर Rtn. प्रशांत निकम यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी Rtn. देवांग शाह, Rtn. महेश पाटील, Rtn. डॉ. शरद बाविस्कर, Rtn. किर्ती कोठारी, Rtn. पूनम कोचर, Rtn. रोहित सिंघवी, Rtn. सनी कोठारी, Rtn. सचिन कोठावडे, Rtn. ईश्वर सैनानी, Rtn. अजय रोडगे, Rtn. प्रतीक जैन, Rtn. चेलाराम सैनानी यांच्यासह रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

स्पर्धेच्या आयोजनात विविध शाळांतील चित्रकला शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. न पाटील सर, मार्ते मॅडम, परदेशी मॅडम आणि पाठक सर यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
स्पर्धेतील ४०० हून अधिक सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

रोटरी क्लब अमळनेर समाजोपयोगी, शैक्षणिक आणि विद्यार्थी विकासाला चालना देणारे असे नाविन्यपूर्ण उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *