खवशी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप; नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला
![]()
खवशी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप; नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला
अमळनेर तालुका प्रतिनिधी (दिनकरराव पवार)
खवशी (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल मराठे, उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच सर्व समिती सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन गणवेशांचे वाटप करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मनापासून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, उपशिक्षक पवार सर, पूनम पवार तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या पोषण आहाराच्या संचालिका कुसुमबाई शिरसाट आणि मदतनीस सुलभा पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी आणि शिक्षणाबाबत उत्साह वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

