राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड*
1 min read

राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड*

Loading

*राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड*

*बीड परळी, प्रतिनिधी :*शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या हिताचे उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.मेघा बालाजी कुमठेकर यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत आदर्श शिक्षिका या साठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धन, विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेऊन आदर्श शिक्षिका हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौ.मेघा बालाजी कुमठेकर आदर्श शिक्षिका
यांना या मानाच्या पुरस्काराबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठीही सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *