हर हर महादेवच्या गजराने दुमदुमला वारीचा मार्ग; अमळनेर ते कपिलेश्वर पायी वारी उत्साहात
![]()
हर हर महादेवच्या गजराने दुमदुमला वारीचा मार्ग; अमळनेर ते कपिलेश्वर पायी वारी उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी(एस.एम.पाटील)
श्री साई गजानन सेवा मंडळ, अमळनेर द्वारा दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायी वारीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी पाचव्या वर्षाची पायी वारी होती.
सकाळी ५:३० वाजता श्रीराम नगर येथील मोठेबाबा मंदिरात मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते महाआरतीने सुरुवात झाली. त्यानंतर मंडळाचे प्रा. आर. व्ही. पाटील यांनी सपत्नीक आरती केली. मंडळाचे विठ्ठल पाटील, सैंधाणे सर, जितेंद्र बोरसे शिंदे नानासाहेब जे बी पाटील व इतर मान्यवरांनी आरती केली. गजानन महाराजांच्या जयघोषात पालखीची सुरुवात झाली.
मोठेबाबा मंदिरावर आर. व्ही. पाटील यांनी सर्व वारकऱ्यांना चहा-पाण्याची व्यवस्था केली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारी मार्गस्थ झाली. मारवाड रस्ता तेथे जितेंद्र बोरसे यांनी राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप केले. वारीत सुमारे 350 भाविक सहभागी होते.
ठिकठिकाणी स्वागत व प्रसाद वाटप
धार गाव येथे सरपंच शशिकांत पाटील यांनी सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले. वारी प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी पाच वर्षांपासून अविरत सेवा दिल्याबद्दल शशिकांत पाटील यांचे कौतुक केले. तेथे केळी, साबुदाणा खिचडी व चहाचा प्रसाद पंगतीत बसून देण्यात आला. शशिकांत पाटील, त्यांचे जावई व पोलीस मित्र सहकाऱ्यांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.
पुढे धानोरे फाट्यावर ‘ओम नमः शिवाय’ च्या जयघोषात वारी पोहोचली. तेथे दीपक पाटील व नितीन निळकंठ पाटील यांनी खजूर वाटप केले. त्यांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष यांनी त्यांचा टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
मारवड येथे मुकेश हिम्मतराव साळुंखे यांनी केळी व खिचडी प्रसादाचे वाटप केले. महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पायी चालणाऱ्या चार ज्येष्ठ महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. मुकेश साळुंखे व कालभैरवनाथ संस्थानचे अध्यक्ष निंबा भाऊसाहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
गोवर्धन येथे प्रवीण पाटील यांनी चहा दिला. कळमसरे फाट्यावर किशोर चौधरी यांनी चिक्की वाटप केले. कळमसरे येथे सेवाधारी पिंटूभाऊ राजपूत यांनी उपवास चिवडा व केळी प्रसाद वाटप केले. पाच वर्षांपासून सेवा देणाऱ्या पिंटूभाऊंचा व ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
निम हायस्कूल व नीम गावात स्वागत
हरिनामाच्या जयघोषात वारी निम हायस्कूल येथे पोहोचली. तेथे सर्व शिक्षकांनी वारीचे स्वागत करून वारी प्रमुख शिवाजीराव पाटील यांचा सन्मान केला व सर्व वारकऱ्यांना शरबत वाटप केले.
त्यानंतर वारी गजानन महाराजांच्या जयघोषात नीम गावी छोटूभाऊ यांच्याकडे पोहोचली. त्यांच्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली अर्पण करून तेथे महासत्संग झाला. छोटूभाऊ यांचाही सन्मान करण्यात आला.
कपिलेश्वर मंदिरात महासत्संग व सन्मान सोहळा
वारी ‘ओम नमः शिवाय’ च्या गजरात श्री क्षेत्र कपिलेश्वर महाराजांच्या दरबारात दाखल झाली. तेथे महासत्संग व भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी महामंडलेश्वर हौसानंदजी महाराज, तीर्थराज श्री महेश महाराज, ट्रस्टचे ट्रस्टी मगनभाऊ पाटील, सी. एस. पाटील सर यांचा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व सचिव विठ्ठल पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तुकाराम बापू चौधरी मंगल तात्या पानाचंद अण्णा पाटील गैभु रामदास पाटील यांचाही मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला
कै. नामदेव बापू यांच्या स्मरणार्थ रमाकांत रामदेव पाटील व चंद्रकांत नामदेव पाटील यांनी मंदिरास ५००१ रुपयांची देणगी दिली, त्यांचाही सन्मान करण्यात आला.
वारी प्रमुख शिवाजीराव मोहन पाटील यांना महामंडलेश्वर हौसानंदजी व तीर्थराज महेश महाराज यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रदान करण्यात आला. टाळ्यांच्या गजरात सर्व भाविकांनी त्याचे स्वागत केले.
मारवडचे योगेश पाटील यांनी स्वतंत्र गाडीने पाणी वाटप केल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. निळकंठ सोनवणे यांचाही सन्मान झाला. कपिलेश्वर ट्रस्टच्या वतीने सुमारे ३५० भाविकांना वरण-भात, बट्टी-भाजी व शिरा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
जय भवानी कॅटर्स पहिला अमळनेर श्री धुडकू पाटील आचारी यांनी पाणीदार सेवा विनामूल्य पुरवली त्याचबरोबर स्वामी मेडिकल विनोद भाऊ निखिल भाऊ यांनी दहा पाकीट ट्रिपशील गोळ्या दिल्या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाब पाटील, सुखदेव पाटील, तुळशीराम पाटील, ईश्वरभाऊ, शनिमहाराज, समाधान पाटील, टेलर, मोठाभाऊ, नानाभाऊ, घनश्याम चौधरी, रमाकांत पाटील, विठ्ठल पाटील, प्रा. आर. व्ही. पाटील, गुणवंत पवार, जितेंद्र बोरसे, डहाळे सर, सुभाष साळुंखे, योगेश बाग, महाले सर, वाल्मिकदादा पाटील, महेश पाटील, अनिलभाऊ गडखांब, सैंधाणे सर, सुरेश धनगर, जे. बी. पाटील आदींनी परिश्रम घेतले
सर्व वारकऱ्यांचे भाविकांचे ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सेवा दिली त्यांचे मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील व सचिव विठ्ठल पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले



