संस्कार, गुणवत्ता आणि यशाचा अखंड प्रवास; जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात
1 min read

संस्कार, गुणवत्ता आणि यशाचा अखंड प्रवास; जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात

Loading

संस्कार, गुणवत्ता आणि यशाचा अखंड प्रवास; जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परिक्षीत बाविस्कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर खा. शि.मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी.जैन व संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल प्रमुख अतिथी होते.
यावेळी व्यासपीठावर
खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कमल कोचर,माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे,कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,संचालक डॉ.संदेश गुजराथी,योगेश मुंदडा, लीना पाटील,संस्थेचे देणगीदार अभिजीत भांडारकर,विवेकानंद भांडारकर,निलेश भांडारकर,अनिल वैद्य,प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव, संस्थेचे सेक्रेटरी प्रा.पराग पाटील, सह चिटणीस प्रा.डॉ.व्हि.बी.मांटे,संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी आर.जे.पाटील, मंगळ ग्रह संस्थेचे सचिव एस.बी.बाविस्कर, सेवा निवृत शिक्षक डी.ए.बहिरम,एस.एन.पाटील, ए.आर. बडगुजर, नंदवे सर,
डी.आर.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,र. सा.पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे,प्रताप हायस्कूल च्या मुख्याध्यापिका एस.पी.बाविस्कर,शाळेचे मुख्याध्यापक व्हि.एम.पाटील,उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे,शिक्षक प्रतिनिधी प्रशांत काटकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भूषण भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.परिक्षीत बाविस्कर यांनी सांगितले की, शाळा हे फक्त शिक्षणाचे नव्हे तर संस्कारांचे देखील मंदिर आहे.शालेय जीवनात सुप्त गुणांना वाव मिळत असतो.मेहनत,कष्ट व चिकाटी या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्याचा यशाचा आलेख उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले. जी.एस.हायस्कूल चा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असून शाळेच्या व संस्थेच्या हितासाठी माझे नेहमी सहकार्य असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी शाळेला ५१ हजारांची देणगी दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला, तसेच शाळेचा वर्धापन दिनाचा लोगो फुग्यांचा सहाय्याने मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात सोडण्यात आला.अहवाल वाचन मुख्याध्यापक व्हि.एम.पाटील यांनी केले.अध्यक्षांचा परिचय उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे यांनी तर प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे यांनी केले.
यावेळी एसएससी परीक्षा,विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सेवानिवृत शिक्षक डी.ए.बहिरम, व्हि.व्हि.कुलकर्णी,उद्योजक भावेश जैन,चेतन पाटील,उपशिक्षक एन जे पाटील,सी.आर.पाटील,प्रशांत काटकर,आर.जे.पाटील तसेच शाळेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन ए.ए.पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक के.पी.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *