वाढदिवसानिमित्त वृक्षवाटपातून डॉ. महेश पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
![]()
वाढदिवसानिमित्त वृक्षवाटपातून डॉ. महेश पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमळनेर प्रतिनिधी : जायन्ट्स ग्रुप, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. महेश रमण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मानव सेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टरांनी माणसाने माणसाची सेवा केली तर मानव सेवा घडते. परंतु जर माणसाने एक झाड लावले तर पर्यावरणाची सेवा घडते आणि पर्यावरणातील असंख्य जीवांना याचा फायदा होतो. त्यांच्या या आदर्शवत विचारातून पर्यावरण प्रेम लक्षात येतं.
डॉक्टर पाटील संत सखाराम महाराज वाडी संस्थान या ठिकाणी आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तसेच ते मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य देखील आहेत आणि या वर्षी जायन्ट्स ग्रुप अध्यक्ष अशा विविध संघटन व सेवा कार्यात त्यांनी आपला ठसा उमटवीला आहें. डॉक्टर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव झाला असून त्यांनी या समाजाप्रती व पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण वाचवा असा संदेश दिला आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास जायन्ट्स ग्रुपचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जयट्स ग्रुप चे युनिट ऑफिसर डॉ सुनील पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा चंदुलाल बडगुजर सर, मार्गदर्शक प्रा पी आर भावसार सर,खजिनदार राजेंद्र पाटील सर , डॉ निलेश सिंगाने, सचिव संदीप महाजन व आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम दि. 15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 8.30 वाजता डॉ. महेश रमण पाटील यांच्या बालाजीपुरा, झामी चौक, अमळनेर येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आला असता डॉ पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराने व जायन्ट्स ग्रुपचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

