खेडी ग्रामस्थांकडून डॉ देसले साहेबांचा सेवापूर्ति जाहीर सत्कार; सौ सुषमाताई देसले-पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक पातोंडा अमलगांव गटातून लढवावी, ग्रामस्थांचा आग्रह
![]()
खेडी ग्रामस्थांकडून डॉ देसले साहेबांचा सेवापूर्ति जाहीर सत्कार; सौ सुषमाताई देसले-पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक पातोंडा अमळगांव गटातून लढवावी, ग्रामस्थांचा आग्रह
अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील खेडी येथे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी (निवृत्त) डॉ. श्री. वासुदेव देसले साहेब यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व सौ सुषमाताई यांची पैनल मधुन सर्वाधिक मतानी शेतकी संघ संचालक पदी निवड़ झालेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन सरपंच सौ आशाताई पवार यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन डॉ देसले साहेब व सौ सुषमाताई यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ देसले साहेब यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि जनाभिमुख सेवाकार्याचा गौरव करत त्यांचे साहेबांसोबत च्या मदत व अदारतिथ्य चे अनुभव चे कौतुक केले व पुढील सामाजिक वाटचालीस त्याना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात ग्रामस्थांनी सौ. सुषमाताई यांच्या ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन मेगा वृक्ष लागवड,महिला सक्षमीकरण ,दहीवद जिल्हा परिषद शाळा जीर्णोद्धार ,पानी तलाव निर्माण ,कोविड। नियंत्रण व विविध सामाजिक उपक्रमांतील कार्याचा गौरव केला. त्यानी दहीवद गावा केलेल्या विकास कामाची पावती म्हणून त्या मार्केट व शेतकी संघातही विक्रमी मतानी विजयी झाल्या तसेच त्यांनी तसीच विकास कामे आमचे गटातील गावातही करावित करिता आगामी जिल्हा परिषद निवडणूक पातोंडा अमलगांव गटातून लढवून व्यापक स्तरावर जनतेची सेवा करावी, अशी आग्रहाची विनंती उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास नानासो प्रा ज्ञानेश्वर पवार, सरपंच सौ आशाताई, आजी माजी पोलिस पाटील ,अमळगांव सोसायटी मा चेअरमन राजू शेठ,श्री विलासराव शिंदे मा उपसरपंच ,ग्रा पं. सदस्य श्री हीरालाल पवार सर,श्री गंभीर शिंदे, डॉ. संजय पवार, जिजाबराव सर, भटू दादा तसेच आजी-माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यामुळे खेडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी देसले कुटुंबाच्या सामाजिक कार्याबद्दल व खेड़ी गावा सोबत ४३ वर्षपासुन त्यांचे संबंध याबाबतही गौरवोद्गार व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

