आषाढी एकादशीनिमित्त ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन
![]()
आषाढी एकादशीनिमित्त ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन
अमळनेर प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत जिव्हाळा फाऊंडेशन, पुणे आयोजित व स्वरसुमन फाऊंडेशन, अमळनेर प्रस्तुत ‘छंद विठ्ठलाचा’ हा विठ्ठलभक्तीचा स्वरसोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक डॉ. अमोघ जोशी आणि सहकारी विठ्ठलभक्तीपर अभंग, भक्तिगीते व सांगीतिक सादरीकरणातून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती देणार आहेत. संगीतप्रेमी आणि वारकरी परंपरेचा साज जपणाऱ्या रसिकांसाठी हा स्वरसोहळा एक पर्वणी ठरणार आहे.
याच कार्यक्रमात डॉ. अमोघ जोशी लिखित ‘कालस्वर – रागसमयचक्राचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील रागसमयचक्राच्या सौंदर्यशास्त्राचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा हा ग्रंथ संगीत अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून प्राप्त होणारा संपूर्ण निधी जिव्हाळा फाऊंडेशनच्या निवासी विद्यार्थीनींच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी समर्पित करण्यात येणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम
कार्यक्रम : छंद विठ्ठलाचा – विठ्ठलभक्तीचा स्वरसोहळा
ग्रंथ प्रकाशन : कालस्वर – रागसमयचक्राचे सौंदर्यशास्त्र
लेखक : डॉ. अमोघ जोशी
दिनांक : शनिवार, २५ जुलै २०२६
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ : पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे
“आपली उपस्थिती लाभदायी ठरेल,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

