कालिदास दिनी संस्कृत साहित्याचा जागर; विद्यार्थ्यांच्या पावसाळी कवितांनी जिंकली मने
1 min read

कालिदास दिनी संस्कृत साहित्याचा जागर; विद्यार्थ्यांच्या पावसाळी कवितांनी जिंकली मने

Loading

 

कालिदास दिनी संस्कृत साहित्याचा जागर; विद्यार्थ्यांच्या पावसाळी कवितांनी जिंकली मने

अमळनेर प्रतिनिधी
महाकवी कालिदास दिनी अमळनेर येथे संस्कृत भारती व ज्ञानराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान पावसाळी कविता आणि मेघदूत निसर्गदर्शन यावर आधारित कार्यक्रम टाऊन हॉलमध्ये संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौ.रा .कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम होत्या प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील संस्कृत शिक्षक संजय पिलेसर यांची उपस्थिती होती त्यांनी महाकवी कालिदासाच्या साहित्याचा आढावा घेऊन मेघदूतातील प्रणय भावनेचे व निसर्ग सौंदर्याचे विवेचन सादर केले मंदाक्रांता वृत्तातील मेघदूत मधील निसर्ग वर्णन आजही प्रेरणादायी आहे असे सांगितले .
या कार्यक्रमात संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत पावसाळी कविता सादर केल्यात
कार्यक्रमाच्या प्रारंभी द्रौ.रा कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी कालिदास अष्टक संस्कृत भाषेत सादर केले.हसरा नाचरा श्रावण आला हे गीत आणि रंगारी श्रावण ही कविता सादर केली
त्यांना सौ प्रज्ञा जोशी यांनी मार्गदर्शन केले होते. कार्यक्रमात जी.एस हायस्कूलचे विद्यार्थी यांनी कालिदास जने जने हे सुंदर संस्कृत गीत सादर केले. ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी
सरसर आयांती वर्षाधारा
हे संस्कृत गीत सादर केले त्यांना कुमारी देवयानी भावसार यांनी मार्गदर्शन केले. सेंड मेरी स्कूल मधील विद्यार्थिनींनी श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता सादर केली त्यांना सौ राहणे मॅडम आणि बागुल मॅडम यांनी मार्गदर्शन केले. संस्कृत विषय घेतलेल्या नववी दहावीतील विद्यार्थ्यांची आणि संस्कृत प्रेमी रसिक श्रोत्यांची चांगली उपस्थिती कार्यक्रमाला होती
वक्त्यांचा परिचय सुधीर टाकणे सरांनी करून दिला सूत्रसंचालन देवयानी भावसार यांनी बहारदार शैलीत केले आभार प्रदर्शन कुमारी भावेश्री जोशी यांनी केले.. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी संस्कृत प्रेम वाढावे व नव्या पिढीला संस्कृत साहित्याचा परिचय करून देण्याच्या प्रेरणेतून संस्कृत भारतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मनोगत प्रा. डॉ. प्रभाकर जोशी सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला छान प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आयोजकांना मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *