आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; विठ्ठलभक्ती, शास्त्रीय संगीत आणि समाजसेवेचा अनोखा संगम  जिव्हाळा फाऊंडेशनच्या उपक्रमातून निवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी निधी; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन
1 min read

आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; विठ्ठलभक्ती, शास्त्रीय संगीत आणि समाजसेवेचा अनोखा संगम जिव्हाळा फाऊंडेशनच्या उपक्रमातून निवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी निधी; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन

Loading

आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; विठ्ठलभक्ती, शास्त्रीय संगीत आणि समाजसेवेचा अनोखा संगम

जिव्हाळा फाऊंडेशनच्या उपक्रमातून निवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी निधी; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन

पुणे प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशन, पुणे आयोजित आणि ‘स्वरसुमन’ प्रस्तुत ‘छंद विठ्ठलाचा’ हा विठ्ठलभक्तीचा भव्य स्वरसोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. बढेकर ग्रुप, पुणे यांच्या प्रायोजकत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात भक्तिरस, शास्त्रीय संगीत आणि समाजसेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) मा. ना. श्री. मुरलीधर मोहोळ राहणार आहेत. तर महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा. मंजुषाताई नागपुरे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे, बढेकर ग्रुपचे चेअरमन मा. श्री. प्रवीण बढेकर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष प्रा. श्री. मिलिंद जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय प्रमुख उपस्थिती म्हणून भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. श्री. शारंगधर साठे तसेच ॐ पूर्णवादी संगीत कला अकादमी, पारनेरच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सौ. संगीता पारनेरकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या स्वरसोहळ्याचे संगीत संयोजन व गायन सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आणि शास्त्रीय गायक डॉ. अमोघ जोशी करणार आहेत. ते स्वर्गीय पं. नाथराव नेरळकर यांचे शिष्य असून त्यांच्या सुमधुर गायनातून विठ्ठलभक्तीचा अनोखा अनुभव रसिकांना लाभणार आहे.
याच कार्यक्रमात डॉ. अमोघ जोशी लिखित ‘कालस्वर – रागसमयचक्राचे सौंदर्यशास्त्र’ या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमाचे निरूपण श्री. स्वप्निल जोशी करणार असून सूत्रसंचालन श्रुती साठे करतील. संगीत साथीसाठी श्रीपाद शिरवळकर (तबला), ऋतुराज धुपकर (संवादिनी), प्रणय सपकाळ (पखवाज), चैतन्य भालेराव (तालवाद्य), तुषार दीक्षित (की-बोर्ड) आणि प्रबोध जोशी (व्हायोलिन) हे नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी (एम.डी.) आणि डॉ. सौ. सुषमा जोशी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
या स्वरयज्ञातून प्राप्त होणारा संपूर्ण निधी जिव्हाळा फाऊंडेशनमधील निवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित करण्यात येणार आहे. त्यामुळे विठ्ठलभक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून पहिल्या दोन रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून ऐच्छिक देणगी प्रवेशिका उपलब्ध आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. राजेंद्र मुठे व अँड. सौ. शर्वरी मुठे यांचे विशेष सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *