शिरूडचा सुपुत्र उप-प्रमुख अभियंता; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा , मुंबई महानगरपालिकेत जितेंद्र जिजाबराव पाटील यांची पदोन्नती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
शिरूडचा सुपुत्र उप-प्रमुख अभियंता; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबई महानगरपालिकेत जितेंद्र जिजाबराव पाटील यांची पदोन्नती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाचे रहिवासी तथा मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले श्री. जितेंद्र जिजाबराव पाटील यांची उप-प्रमुख अभियंता (Deputy Chief Engineer) पदावर पदोन्नती झाल्याने शिरूड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. पाणीपुरवठा प्रकल्पांचे नियोजन, संशोधन, रचना व बांधकाम, जलवितरण व्यवस्थापन, पाणी शुद्धीकरण केंद्रांचे प्रभावी व्यवस्थापन, जलवितरण व्यवस्था बळकटीकरण, तसेच रस्ते बांधकाम आणि विविध पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, दूरदृष्टी आणि समर्पित कार्यशैलीमुळे महानगरपालिकेच्या अनेक महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना यश मिळाले आहे. त्यांच्या कार्याचा लाभ लाखो मुंबईकरांना होत असून, सार्वजनिक सेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.
या पदोन्नतीमुळे मुंबई महानगरपालिकेला अधिक सक्षम आणि अनुभवी नेतृत्व लाभणार असून, भविष्यातही नागरिकाभिमुख, गुणवत्तापूर्ण व आधुनिक पायाभूत सुविधा उभारणीसाठी श्री. पाटील यांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

