पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे
1 min read

पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे

Loading

पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का?
-संदीप घोरपडे

अमळनेर प्रतिनिधी
सहनशीलतेच्या कक्षा अमळनेरकर नागरिकांच्या रुंदावत चालल्या या अमळनेर शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देता देता सर्वसामान्य नागरिक मेटाकोटीला येतात मात्र त्यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारताना दिसून येत नाही वर्षानुवर्ष शेतकरी आपले प्रतिनिधी शेतकी संघात कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हा परिषद पंचायत समितीत पाठवितात मात्र ना शेतापर्यंत जाण्यासाठी शिवार रस्ते ना अवर्षण प्रवण भागापर्यंत सिंचन व्यवस्था अशाही कठीण परिस्थितीत उत्पादित केलेला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत आल्यावर कधीही समाधानकारक भाव मिळाला नाही तरी ओरड करताना शेतकरी दिसत नाही थोडेफार पाणी असलेला शेतकरी भाजीपाला फळभाजी अथवा इतर प्रयत्न करताना भाजीपाला मंडईत अत्यंत हिरमुसला दिसतो कारण त्याला केलेला खर्च आणि हातात आलेला तुकडा भाव याचा मेळ बसताना दिसत नाही त्याचप्रमाणे शहरी भागातील नागरिकांना लोकसभा विधानसभा यात आपले प्रतिनिधी पाठवून कधीही आपल्या समस्यांना वाचा फोडून ते जनतेच्या हृदयात स्थान मिळवतील अशी संधी प्राप्त करता आली नाही अगदी त्याच न्यायाने नुकताच आलेला अथवा ओढवून घेतलेला अमळनेर शहरांमधील पूर ज्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले अनेकांच्या घरातील किमतीऐवज मातीमोल झाला अन्नधान्य भिजल्यामुळे त्याची नासाडी झाली अनेकांच्या टू व्हीलर फोर व्हीलर नादुरुस्त झाल्याने हजारो रुपयांची नुकसान झाले या पलीकडे जाऊन अंमळनेर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले अनेक दिवस उलटूनही नागरिकांना नियमित पाणीपट्टी घरपट्टी भरूनही फारश्या अपेक्षा नसताना फक्त पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे एवढीच छोटीशी भाबडी मागणी नगरपालिका पूर्ण करू शकत नाही असे दिसते बरे पाणी हे तर प्रत्येक जीवाला जीवनावश्यक सर्व जगभर मान्य आहे परंतु अमळनेर नगरपालिकेतील व्हिडिओ फोटोग्राफी आणि आरोप प्रत्यारोप करताना आपत्ती व्यवस्था करताना सर्वसामान्य नागरिकांना पाणी कधी येईल कसे वाटप होईल पुरेशी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नाही वस्तूतः सर्व प्रकारच्या व्यवस्था नगरपालिकेत उपलब्ध असताना देखील इच्छाशक्तीचा अभाव अथवा अन अनुभवी लोकप्रतिनिधी यामुळे जनतेमधून फक्त आणि फक्त पाणी पाणी एवढाच आवाज येतोय आणि काही क्रियाशील नगरसेवक वगळता बहुतांश शहरी भागात नगरसेवकांचा नागरिकांशी संपर्क तुटलेला आहे की निवडून देण्याची अथवा निवडून येण्याची प्रक्रियाच चुकलेली आहे याची अनेकांच्या मनात चूकचूक लागून राहिलेली आहे आता तरी अनेकांच्या डोळ्यात आलेले पाणी भविष्यात पाणीदारपणे वागण्यासाठी पुरेसे आहे अजूनही नगरपालिकेतील जबाबदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आवर्जून नम्रपणे आवाहन करतो की नागरिकांना सजगतेने समजावून सांगा कोणत्या प्रभागात कोणत्या वेळी किती कालावधीनंतर पाणी मिळेल आणि त्यांना पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी जबाबदारीचे भान ठेवून सहकार्य करावे असे संदीप घोरपडे
एक सजग नागरिक अमळनेर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *