कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट , रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण
1 min read

कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट , रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण

Loading

कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट

रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण

अमळनेर प्रतिनिधी

रोटरी इंटरनॅशनलच्या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोटरी क्लब अमळनेरने समाजसेवेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत कृषी दिन आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वपूर्ण विषयांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन केले. नूतन अध्यक्ष महेश पाटील, नूतन सचिव तथा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि त्यांच्या कार्यकारिणीने उत्साहात कार्यारंभ करत शेतकरी सन्मान व हरित संवर्धनाचा संदेश दिला.
राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त तांबेपुरा, रंजाणे, तासखेडा आणि नंदगाव परिसरातील शेतकरी बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी संजय पाटील, भरत पाटील, सुकलाल पाटील, शालिक पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेर व हाऊसिंग महिला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दोन हजार सीड बॉलचे वितरण करण्यात आले. पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल आणि डी.आर. कन्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना हे सीड बॉल देऊन वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली.
यावेळी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक देवरे सर, पी. ए. वंजारी, कु. एम. एस. बारी तसेच डी.आर. कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, सचिव प्रशांत निकम, चेलाराम सेनानी, डॉ. अनिल वाणी, सनी कोठारी, प्रीतपालसिंग बग्गा, अजय रोडगे, आशिष चौधरी यांच्यासह रोटरीयन सदस्य आणि हाऊसिंग महिला ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती रोटरी क्लबचे सदस्य मकसूद बोहरी यांनी दिली. कृषीप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *