कर्तृत्वाला सलाम; गुणवंतांचा जल्लोषात गौरव , श्री.संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर,”गुणगौरव समारंभ संपन्न”
![]()
कर्तृत्वाला सलाम; गुणवंतांचा जल्लोषात गौरव
श्री.संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर,”गुणगौरव समारंभ संपन्न”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर,क्षत्रिय काच माळी समाज मढी येथे संत सावता माळी सेवा मंडळा कडून दि.१६ आॅगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजिवन समाधी सोहळा निमित्त भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष -डाॅ.प्रकाशजी साळुंखे सेवानिवृत्त प्राचार्य आयुवैद काॅलेज बोराडी(शिरपूर), प्रमुख अतिथी -श्री.हनुमंतजी महाजन (अडावद)श्री.डाॅ..विकासजी गिते ,रसायन शास्त्रज्ञ (पिंपळगाव -हरे)श्री.कैलास भावलाल माळी, माळी समाज अध्यक्ष, पारोळा, श्री.अनिलजी महाजन (आबुदादा)मा.उपनगराध्यक्ष,नगर सेवक,(अमळनेर) श्री.डाॅ.योगेशजी महाजन, संस्थापक, अध्यक्ष -परिश्रम मतीमंद मुला-मुलीची निवासी शाळा, पारोळा,श्री.मनोहर महाजन सर, माळी समाज अध्यक्ष, अमळनेर,सौ.विमलबाई हिंमत महाजन,अध्यक्षा-क्रांतीजोती सावित्रीबाई फुले महिला मंडळ अमळनेर, श्री.मोतीलालजी जैन (महाविर एम्पोरियम, अमळनेर),श्री.राजु गंगाराम महाजन, अध्यक्ष -सेवा मंडळ, अमळनेर,श्री.चद्रकांत महाजन, उपाध्यक्ष -सेवा मंडळ, अमळनेर, यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच समाजातील, विविध क्षेत्रातील निवड,यश संपादन करणाऱ्या बंधु-भगिणीचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे ईशस्वन-सौ.चित्रकला महाजन,सौ.मनिषा महाजन यांनी केले व स्वागतगीत सौ.भारती चव्हाण मॅडम,सौ.रंजना महाजन यांनी गायले कार्यक्रमाचे प्रास्ताविक -श्री . मनोहर महाजन सर यांनी केले,सुत्रसंचलन,परिचय-श्री.गणेश महाजन सर, श्री.प्रा.डाॅ.सुभाष महाजन यांनी तर आभार प्रदर्शन -श्री.अॅड सुदाम माळी यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमास क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, समाज बंधु-भगिणीची मोठ्या प्रमाणावर उपस्थिति होती…

