जि.प.मारवड शाळेला व विद्यार्थ्यांना युवा चैतन्य फाऊंडेशन तर्फे अनोखी भेट , शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी 2 जार भेट व 132 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वितरण…
![]()
जि.प.मारवड शाळेला व विद्यार्थ्यांना युवा चैतन्य फाऊंडेशन तर्फे अनोखी भेट
शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी 2 जार भेट व 132 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वितरण…
अमळनेर प्रतिनिधी
मारवड ता.अमळनेर येथील जिल्हा परिषद शाळेत मारवड विकासमंच चे संस्थापक तथा आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांच्या कार्यातून प्रेरीत होऊन शाळेचे माजी विद्यार्थी, युवा चैतन्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक इंजिनिअर परेश मगर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची तहान मिटवण्यासाठी व शैक्षणिक गरज पुर्तीसाठी अभिनव उपक्रम घेण्यात आला.
आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा मारवड येथे युवा चैतन्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परेश मगर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यासोबत विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शाळेला 2 पाणी जार भेट देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवड गावाचे सरपंच भिकनराव पाटील, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख वैशाली पाटील, मारवड हायस्कूलचे माजी प्राचार्य एल.जी.चौधरी यांचेसह युवा चैतन्य फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश मगर, फाऊंडेशनचे मार्गदर्शक सदस्य तथा सेवानिवृत्त शिक्षक किशोर मगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर पाटील, अमळनेर येथील पंकज भदाणे, मनोज बागुल, मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, उपशिक्षक गिरीष पाटील, सविता पाटील, चेतना वानखेडे, सुधीर पाटील उपस्थित होते.
सदर प्रसंगी माजी प्राचार्य एल.जी.चौधरी सर यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर मगर यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व इंजि.परेश मगर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करुन निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी व आभार गिरीष पाटील यांनी मानले.
युवा चैतन्य फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


