संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करा आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्रीना विनंती,विधान भवनात घेतली भेट
![]()
संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करा
आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्रीना विनंती,विधान भवनात घेतली भेट
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज दिनांक 3 रोजी सकाळी मुंबई येथे विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अमळनेर येथील प पु संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीबाबत माहिती दिली.व तातडीने मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की खान्देशचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला 1 जुलै 2026 रोजी रात्री भीषण आग लागून अंदाजे 250 वर्षे जुना ऐतिहासिक लाकडी गाभारा पूर्णपणे जळून खाक झाला. या दुर्घटनेत सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत गाभाऱ्याचे वैभव जळून नष्ट झाले असले तरी सुदैवाने मंदिर व मूर्ती सुरक्षित राहिल्या आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
*वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या:*
25 जुलै रोजी आषाढी एकादशी असून खान्देशातून हजारो भाविक दरवर्षी येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. 250 वर्षांपासूनची परंपरा असलेले हे पुरातन लाकडी मंदिर जळाल्याने लाखो वारकरी व भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या संस्थानाचे पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक असल्याने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शासनाने प्रस्ताव मागवून सुमारे 15 कोटी निधी उपलब्ध करून मंदिर संस्थान पुनर्जीवित करावे, अशी विनंती आमदार पाटील यांनी केली आहे.
यावर मा.मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन याबाबत सकारात्मक भूमिका घेईल अशी ग्वाही आमदारांना दिली आहे.

