महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप !… बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : सुरज वाघरे
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप !…
बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : सुरज वाघरे
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे माजी विद्यार्थी पापाशेठ वाघरे, पत्रकार अविनाश बाविस्कर, सुरज वाघरे, रवी करोसिया, संजय सोनवणे, माजी हॉलीबॉलपटू चेतन वाघरे, माजी कुस्तीपटू नरेंद्र बिवाल, प्रल्हाद पचेरवार, संजय पचेरवार, सुजीत वाघरे, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात शाळेतील विद्यार्थ्यांना १० ड्रेस , शैक्षणिक साहित्य – १० डझन वह्या , २० चित्रकला वही, २० रंगपेटी, २० कंपास पेटी व २० पेन मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी सुरज वाघरे विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण घ्यावे आम्ही ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांना केलेली आहे. तुम्ही शिका, मोठे व्हा ! शाळेचे व परिवाराचे नाव मोठे करा. बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश वाघरे यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी शाळेच्या विविध परीक्षांची, वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रम, पुस्तक पेढी, वृक्षारोपण या संदर्भात विस्तृत माहिती दिली. मुख्याध्यापकांनी या स्थुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.

