अमळनेर युनियन बँकेच्या शाखाप्रबंधकपदी मयूरजी पाटील रुजू; हिंदी अध्यापक मंडळाकडून जाहीर सत्कार , शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायम सहकार्याची ग्वाही
![]()
अमळनेर युनियन बँकेच्या शाखाप्रबंधकपदी मयूरजी पाटील रुजू; हिंदी अध्यापक मंडळाकडून जाहीर सत्कार
शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायम सहकार्याची ग्वाही
अमळनेर प्रतिनिधी
शहादा येथील युनियन बँकेचे मुख्य प्रबंधक मयूरजी पाटील यांनी नुकताच अमळनेर येथील युनियन बँकेच्या शाखाप्रबंधक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी मयूरजी पाटील यांनी यापूर्वीही हिंदी अध्यापक मंडळाच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल आणि मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या अमळनेरमधील कार्यकाळातही असेच सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना शाखाप्रबंधक मयूरजी पाटील म्हणाले, “हिंदी अध्यापक मंडळाने केलेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. मंडळाच्या शैक्षणिक, सामाजिक व विधायक उपक्रमांसाठी यापुढेही मी सदैव सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन.”
यावेळी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव दिलीप पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन. आर. चौधरी, माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, आशिष शिंदे, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, सदस्य सुनील पाटील, प्रशांत वंजारी तसेच मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी मयूरजी पाटील यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

