सडावन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय बॅग व साहित्य वाटप
![]()
सडावन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय बॅग व साहित्य वाटप
अमळनेर: – रुक्मिणीबाई प्रतिष्ठान संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावन येथे वर्मा परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
अमळनेर येथील सौ.अर्चना गिरीश वर्मा व त्यांचे सुपुत्र कृष्णा गिरीश वर्मा यांच्यातर्फे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगा व पेन देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातुन हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक उल्हास पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या मदतीबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक एस. बी. पाटील, एस. आर. पद्ममार, उपशिक्षिका वैशाली पाटील, भारती पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
—

