वृक्षारोपण आणि समाजसेवेचा वसा जपणारी निसर्ग मित्र समिती कौतुकास पात्र” — पालकमंत्री जयकुमार रावल  .पर्यावरण संवर्धनाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारांनी कर्तृत्वाचा गौरव
1 min read

वृक्षारोपण आणि समाजसेवेचा वसा जपणारी निसर्ग मित्र समिती कौतुकास पात्र” — पालकमंत्री जयकुमार रावल .पर्यावरण संवर्धनाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारांनी कर्तृत्वाचा गौरव

Loading

वृक्षारोपण आणि समाजसेवेचा वसा जपणारी निसर्ग मित्र समिती कौतुकास पात्र” — पालकमंत्री जयकुमार रावल

.पर्यावरण संवर्धनाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारांनी कर्तृत्वाचा गौरव

दोंडाईचा प्रतिनिधी-
पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक बांधिलकीची अखंड ज्योत तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार’ प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दोंडाईचा येथील हस्ती भवन येथे भव्य पर्यावरण मेळावा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे होते. प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारूडे, प्रदेशाध्यक्ष डी. आर. पाटील, जिल्हा सचिव विश्वास पगार, शिसोदे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय आयकॉन सन्मान व विविध पर्यावरणविषयक उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले, “समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधव-भगिनींचा गौरव करणे ही अत्यंत प्रेरणादायी परंपरा आहे. निसर्ग मित्र समितीने पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आदर्श निर्माण केला आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा पुरस्कारांनी सन्मान करणे हा समितीचा उपक्रम खरोखरच अभिमानास्पद आहे. निसर्ग मित्र समितीचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
कार्यक्रमात पर्यावरण, सामाजिक सेवा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्तांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आदर्श शिक्षक यशवंत निकवाडे यांनी केले. राज्य सचिव संतोष आबा पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर
सेवानिवृत्त विज्ञान व क्रीडा शिक्षक व निसर्ग समितीचे तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव विश्वास पगार, मनोज पाटील, विनयकुमार पाटील, निसर्गदादा अहिरे, अक्षय पवार तसेच समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच समाजासाठी कार्य करणाऱ्यांच्या सन्मानाने हा रौप्यमहोत्सवी सोहळा प्रेरणादायी ठरला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *