श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
1 min read

श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

Loading

श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज
६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

 

अमळनेर प्रतिनिधी

दि. ११/०८/२०२६ वार मंगळवार रोजी अमळनेर – शिंपी समाज मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्त निवास वाडी संस्थान येथे श्री. राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा संजीवन समाधी (पालखी) सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ९.०० वाजता पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ठिक ११.०० वाजता पालखीची सांगता झाली. त्यावेळी नामदेव महाराज यांच्यावर नारदीय व्याख्याते ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रभाकर ज. जोशी यांनी प्रवचन सादर केले, याप्रसंगी शिंपी समाज मंडळाचे सल्लागार श्री. विवेकानंद भांडारकर यांनी ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रभाकर ज. जोशी यांचा सत्कार केला. अतिशय नाविन्यपूर्ण माहितीवर ते प्रवचन झाले. त्यानंतर हार व आरतीचा लौलाव करून महाप्रसादाला सुरुवात झाली.
त्यावेळी शिंपी समाज अध्यक्ष- श्री.भरत भिका शिंपी व त्यांचे कार्यकारी मंडळ, महिला अध्यक्ष सौ.सुनेत्रा भांडारकर व त्यांचे कार्यकारी मंडळ, तरुण युवक मंडळ व समाजातील थोर स्त्री-पुरूष मंडळी हजर होते. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र मांडगे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *