दोन थेंब जीवनाचे’… अमळनेरमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद  १२,९६२ बालकांचे उद्दिष्ट; दुपारी १२ वाजेपर्यंत ५,६६१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस
1 min read

दोन थेंब जीवनाचे’… अमळनेरमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद १२,९६२ बालकांचे उद्दिष्ट; दुपारी १२ वाजेपर्यंत ५,६६१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

Loading

‘दोन थेंब जीवनाचे’… अमळनेरमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१२,९६२ बालकांचे उद्दिष्ट; दुपारी १२ वाजेपर्यंत ५,६६१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

अमळनेर | प्रतिनिधी :
अमळनेर शहरात रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक डोस पोहोचावा, या उद्देशाने संपूर्ण शहरात ७८ पोलिओ बूथ उभारण्यात आले असून रेल्वे स्थानक व बसस्थानक येथे स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

शहरालगतच्या दुर्गम व वंचित भागांतील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मोबाईल पथकांद्वारे घरपोच सेवा देत पोलिओचे डोस दिले जात आहेत. या व्यापक मोहिमेसाठी २३४ कर्मचारी आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी १६ सुपरवायझर कार्यरत आहेत.

या मोहिमेत शहरातील १२,९६२ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, दुपारी १२ वाजेपर्यंत ५,६६१ बालकांना (४३ टक्के) पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

या जनजागृती व आरोग्य मोहिमेसाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनीही मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहकार्य केले.

मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

“प्रत्येक बालकाला पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ‘दोन थेंब जीवनाचे’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या मोहिमेतून प्रत्यक्षात साकार होत आहे,” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *