चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी! , करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू
1 min read

चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी! , करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू

Loading

चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी!

करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू

अमळनेर प्रतिनिधी : खेळाच्या तासाला बॅडमिंटन खेळत असताना अचानक चिमणीच्या पिलाची चिवचिव हितांशू कन्हैयालाल महाजन (इयत्ता आठवी) यांच्या कानावर पडली. आवाजाच्या दिशेने पाहिले असता चिमणीचे पिल्लू घरट्यात पाय अडकल्याने उलटे लटकलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पिल्लू सुटण्यासाठी धडपडत होते, तर दुसरीकडे त्याची आई चिमणीही अस्वस्थपणे चिवचिव करत पिल्लाला सोडविण्याचा प्रयत्न करत होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच हितांशूने क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. काळजीपूर्वक चिमणीच्या पिलाला घरट्यातून सोडवून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले. पिल्लू सुरक्षित झाल्यानंतर चिमणीची अस्वस्थता कमी झाली आणि ती पुन्हा आपल्या पिल्लाजवळ पोहोचली.

या छोट्याशा प्रसंगातून विद्यार्थ्यांमध्ये पक्षी व प्राण्यांप्रती करुणा, संवेदनशीलता आणि दयाभाव किती खोलवर रुजला आहे, हे दिसून आले. करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये “प्राणीमात्रांवर दया करा, त्यांच्या जीवाचेही महत्त्व आहे” हा संस्कार रुजविला जात असून, हितांशूने केलेल्या या कृतीत त्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.

करुणेचा संस्कार, माणुसकीचा आदर्श!

हितांशूने दाखविलेली ही संवेदनशीलता भविष्यातही पशु-पक्ष्यांप्रती दया आणि माणुसकीची भावना जपण्यास प्रेरणा देणारी आहे. ‘जय हो करुणा’ या भावनेतून घडलेली ही कृती विद्यार्थी, शाळा आणि समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.
या संवेदनशील कार्याबद्दल करुणा क्लबचे महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर व प्रचारक भुपेशभाई चारण, जिल्हाध्यक्ष दिनेश पालवे, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, शिक्षकवृंद तसेच करुणा क्लबच्या सर्व सदस्यांनी हितांशू कन्हैयालाल महाजन यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *