प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचविण्याचा निर्धार; पारोळ्यात मोहिमेचा प्रारंभ
1 min read

प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचविण्याचा निर्धार; पारोळ्यात मोहिमेचा प्रारंभ

Loading

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

आज कुटीर रुग्णालय, पारोळा येथे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे आमदार दादासाहेब. अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, देवगांव सरपंच समिरदादा पाटील, मा.सभापती डॉ.सुभाषनाना पाटील, शेतकी संघाचे मा.संचालक दासभाऊ पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीन सोनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत सुभाष सूर्यवंशी, बांधकाम व्यावसायिक पी.आर.वाणी, विलास वाघ, यांचेसह आदी मान्यवर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या मोहिमेद्वारे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व पालकांना आपल्या परिसरातील एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, श्री गजेंद्र निकम औषध निर्माण अधिकारी,श्री महेश पाटील आरोग्य सहाय्यक, श्री राकेश शिंपी आरोग्य सेवक, श्री भूषण अजितराव पाटील तालुका लेखापाल , तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी हे अत्यंत समर्पितपणे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले

“दोन थेंब प्रत्येक वेळी… पोलिओमुक्त भारतासाठी आपली जबाबदारी!”

चला, आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *