अ.भा.म.सा.प. या संस्थेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून सचिन राजपूत यांची नियुक्ती.*
![]()
*अ.भा.म.सा.प. या संस्थेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून सचिन राजपूत यांची नियुक्ती.*
धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नवोदित साहित्यिक असलेले सचिन राजपूत यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून निवड हे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी २० जून २०२६ रोजी केली असून धुळे जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री. हिरामण सोनवणे यांनी या निवडीचे स्वागत केले, यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. हिरामण सोनवणे यांच्यासह मा. शुभांगी काळभोर (राष्ट्रीय उपाध्यक्षा), मा. ज्ञानेश्वर पतंगे (राष्ट्रीय विश्वस्त), मा. फुलचंद नागटिळक (राष्ट्रीय खजिनदार), मा. हिरामण सोनवणे ( जिल्हाध्यक्ष, धुळे ), मा. प्रा. प्रशांत कोतकर ( कार्याध्यक्ष, धुळे ), मा. वैशाली बोरसे ( जिल्हा सह कार्याध्यक्षा, धुळे ), मा. प्रा. डॉ. सतिश पाटील ( जिल्हा उपाध्यक्ष, धुळे), मा. अरुणा पवार (जिल्हा उपाध्यक्षा, धुळे), मा. संगिता भामरे (जिल्हा सचिव,धुळे), मा. वृंदा दिपक राव (अध्यक्षा, धुळे तालुका), मा. राकेश अग्निहोत्री (अध्यक्ष, साक्री तालुका), मा. वंदना गवळे (अध्यक्षा ,शिरपूर तालुका), मा. विनायक पाटील (समन्वयक, धुळे) यांनीही त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही संस्था मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धन, जतन व प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे. मराठी भाषेची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, साहित्यिक विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिकांना एकत्र आणणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या माध्यमातून कविता, कथा, कादंबरी, लेख, चारोळ्या, समीक्षा, नाटक अशा विविध साहित्यप्रकारांना प्रोत्साहन दिले जाते. नवोदित लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींना त्यांच्या लेखनकौशल्याचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्रे, साहित्य संमेलने आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्याचे कार्यही संस्था करते. मराठी भाषेचे महत्त्व समाजात दृढ करणे, वाचनसंस्कृती वाढवणे, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर साहित्यिक संवाद घडवून आणणे तसेच साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे हेही संस्थेचे महत्त्वाचे ध्येय आहे. महाराष्ट्रासह देशभरातील मराठी साहित्यिकांना एकत्र आणून साहित्य क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि मराठी भाषेचा गौरव वाढवणे हा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा मूलभूत उद्देश आहे व तो उद्देश पूर्ण करण्यात धुळे जिल्हा व विशेष करून शिंदखेडा तालुक्याचाही खारीचा वाटा असेल, असे सचिन राजपूत यांनी म्हटले आहे.


वाह अतिशय सुंदर फातमी !🌹🌹🌹👏👏👏🫡🫡🫡