संस्कारांचा परिसस्पर्श अनुभवणारे ‘निशब्द आकाश’ ,प्रा. भगवान पाटील यांच्या लेखणीतून उलगडलेली महान व्यक्तिमत्त्वांची जीवनगाथा
![]()
संस्कारांचा परिसस्पर्श अनुभवणारे ‘निशब्द आकाश’
प्रा. भगवान पाटील यांच्या लेखणीतून उलगडलेली महान व्यक्तिमत्त्वांची जीवनगाथा
पुस्तक परिचय
निशब्द आकाश
लेखक :प्रा. भगवान पाटील
” निशब्द आकाश” हे प्रा. भगवान पाटील यांचे ललित लेखसंग्रहाचे पुस्तक, पुणे येथील शब्द वैभव प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. जवळजवळ 125 पेजेस चे हे पुस्तक असून याचे मूल्य रुपये 150 /- आहे .
प्रा. भगवान पाटील सर हे खानदेशात एक सिद्ध हस्त लेखक म्हणून परिचित असून त्यांचे या अगोदर सात वेडे वीर ,खोप्यातील परीस, खरा शिक्का, गोंदन, तसेच अहिराणीतले” चांगभलं”, “नियोग” वगैरेही साहित्य प्रकाशित झालेले आहे .
मुळात “निशब्द आकाश” हे त्यांना त्यांच्या आयुष्यात भेटलेले मोठमोठे व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे त्यांचे आयुष्य सोन्याचे झाले. मग त्यात प्रकाश भाई मोहाडीकर असतील, सेवा दलाचे त्यांचे गुरु शरद भानगावकर असतील , डॉ मु ब शहा असतील, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेता प्रा. गं प्र प्रधान असतील समाजवादी विचारवंत भाई वैद्य तसेच पन्नालाल सुराणा असतील, स्काऊट गाईडचे बापूसाहेब टीपी महाले वगैरे अशा महान, महनीय व्यक्तींच्या सानिध्यात ते आले. खरंतर हे आपल्या सारख्या जनसामान्यांसाठी हेवा वाटावा असं आहे. प्रा. भगवान पाटील सर हे सेवा दलाचे सैनिक होते आणि राष्ट्रसेवा दलाचे बाल सैनिक म्हणून त्यांनी चांगल्यापैकी काम केलेले होते. विशेष म्हणजे सेवा दलाच्या शिबिरासाठी ते धुळे ते पुणे सायकलीवर गेलेले होते आणि याचेच विशेष कौतुक त्यांचे झालेले होते. धुळ्याला आल्यानंतर त्यांच्यातील सेवा दलाची आवड असल्यामुळे त्यांनी सेवा दलाचे प्रत्येक शिबिरात सहभाग घेतला. त्यानंतर स्काऊट आणि गाईड मध्येही त्यांना आवड असल्यामुळे टीपी महाले सरा च्या सानिध्यात ते आले. अशाप्रकारे या सर्व माननीय व्यक्तींचे व्यक्तिचित्रण त्यांच्या सानिध्यात आल्या नंतरचा आलेला अनुभव ..!खरंतर प्रा. भगवान पाटील सरांच्या प्रत्येक्ष जीवन घडविण्याला हा एक परिस स्पर्श झाला असं समजावं.
विशेष म्हणजे त्यांनी भाई वैद्य विषयी खूप चांगला अनुभव इथे सांगितलेला आहे. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला बहादरपूर सारख्या आड वळनाच्या गावाला भाई वैद्य उपस्थित झाले होते. प्रकाशन समारंभ झाल्यानंतर ते लगेचच पुण्याकडे जाण्यासाठी भुसावळला निघाले. विशेष म्हणजे त्यासाठी काली पिली या वाहनाचा उपयोग सरांनी केला. पुण्याला जाणे आवश्यक होतं. महाराष्ट्र राज्याचे मा.गृहमंत्री ,पुण्याचे माजी महापौर ,थोर समाज सुधारक ,राजकारणी, लेखक विचारवंत, समाजवादी विचारांचे महान व्यक्तिमत्व परंतु साध्या “काली पिली” गाडी ने ते भुसावळला आले. स्वतः भगवान पाटील सुद्धा त्यांच्यासोबत होते. परंतु भुसावळला आल्यानंतर कळले की, पुण्याकडे जाणारी गाडी 11 तास लेट आहे. त्यांना कसेही करून पुण्याला पोहोचणं आवश्यक होतं. अशावेळी त्यांनी जळगावहून त्यांना लक्झरीचे तिकीट मिळत नसल्यामुळे औरंगाबाद चौफुलीवर लक्झरी च्या ड्रायव्हरच्या मागील सीटवर ते जाऊन बसले. त्याला विनंती केली. आणि अशा परिस्थितीत त्यांनी पुण्याच्या प्रवास केला.
खरंतर यातच भाई वैद्य यांचे मोठेपण जाणवते. थोर समाजसेवक, पुण्याचे महापौर , महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री असं सर्व काही असताना सुद्धा पुण्यातील कार्यक्रम महत्त्वाचा आहे म्हणून त्यांच्या जीव कासावीस होत होता. एवढा मोठा माणूस पण त्यांच्याकडे खाजगी गाडीही नव्हती. खरंतर या अशा गोष्टी आज आपण वाचल्यानंतर आपल्याला, आजच्या येणाऱ्या तरुण पिढीला खरं सुद्धा वाटणार नाही..!
असेच अनुभव त्यांनी सुराणा सरां विषयी लिहिले. विशेष म्हणजे प्रा. ग प्र प्रधान यांच्यासोबत च्या त्यांनी चांगल्या आठवणी जतन करून ठेवलेल्या होत्या. त्याचबरोबर युवकांचे स्फूर्ती स्थान लोकशिक्षक यदुनाथ जी थत्ते याच्याविषयी आठवणी सांगताना सर खूप भावनिक होतात.
हे सर्व जेवढे ही या पुस्तकात आलेले थोर नेते आहेत .हे राजकारणी असले तरी समाजकारण हाच त्यांचा समाज जीवनाशी जुळण्याचा धागा होता.
समाजकारणी ,राजकारणी असले तरी त्यांचे साधी सरळ, सर्वसामान्य जीवन जगण्याची तर्हा पाहून आजचे राजकीय नेतृत्व कुठे आणि हे थोर माणसं कुठे ..? खरं तर या दोन ध्रुवा च्या दोन टोकाच्या गोष्टी ठरतील.
अशी माणसं आपल्यात होऊन गेली हे आजच्या पिढीला खरंतर वाटेल का ..?ही शंका येते.
त्यात त्यांनी 1975 ला बाबा आमटे यांच्या “सोमनाथ प्रकल्पकावर” श्रमदान, संस्कार शिबिर घेतले होते. त्याच्याही अनुभव सांगितलेला आहे .स्वतः यदुनाथ थत्ते हातात कुदळ, पावडी घेऊन सर्व युवकांच्या पुढे “पाणी आडवा पाणी जिरवा “संदेश देऊन प्रत्येक्ष माती वाहत होते. खरंतर आजच्या युवकांसाठी ये स्फूर्तीदायक आहे.
– आणि त्यामुळे भगवान पाटील सरांनी “निशब्द आकाश” जे काही लिहिलं ते येणाऱ्या तरुण पिढीसाठी एक मार्गदर्शक पुस्तक म्हणून वाचनीय ,दर्जेदार होईल.
आजच्या राजकारण्यांनी हे पुस्तक विशेष करून वाचलं पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्या समाज सुधारण्या साठी संस्कारशील समाज कसा असावा..? याचे आदर्श उदाहरण दिले जाईल.
विशेषता भगवान पाटील सर एक ग्रामीण भागातून पारोळा तालुक्यातील महाळपुर सारख्या ग्रामीण भागातून आलेले होते.घरची परिस्थिती अत्यंत दारिद्र्याची असताना सुद्धा ,त्यांची शिक्षणाची तळमळ आणि त्यात जोडीला राष्ट्रसेवा दलाची ओढ..! यामुळे त्यांना आयुष्याचे धडे शिकण्यासाठी अशा थोर महान व्यक्तींचा चरण स्पर्श मिळाला. त्यातच त्यांचे सोने झाले..!
संस्कारशील जीवन कसे असावे याचा परिपाठ त्यांना तारुण्यात मिळाला. त्यामुळेच ते एक यशस्वी लेखक होऊ शकले…!
या पुस्तकात त्यांनी विशेष करून आबाई ,रमाबाई पाटील यांच्या विषयी लेख लिहिलेले आहेत. खर तर आपल्या माया- बहिणी सतत झटणाऱ्या ,दुसऱ्यासाठी राबणाऱ्या, सर्वाची काळजी घेणाऱ्या ..खाऊ- पिऊ घालणाऱ्या .. अशा व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. प्रत्येकाच्या घराघरातआपल्या माया बहिणी अशाच होत्या.
या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची ही ओळख होते. आणि आपणच आपल्या घरात आपल्या आबाई ,आपल्या रमाई शोधत राहतो.
माजी आमदार कै. सदाशिव माळी यांच्या विषयी त्यांनी विशेष लेख लिहिला आहे. अहिराणी साहित्य परिषद आणि प्रा.सदाशिवराव माळी आणि त्यानिमित्ताने भगवान पाटील सर कसे एक त्र आले. याविषयी त्यांनी विस्तृत असं वर्णन आपल्या लेखात लेखात केलेले आहे .
असे वाचनीय, दर्जेदार “निशब्द आकाश” सर्वसामान्य वाचकांनी एक वेळ जरूर वाचावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो.
शब्दाकंन
गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी,
मू.पो.ता. अमळनेर.
जिल्हा जळगाव.
मो.9422276140

