हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात योगसाधनेचा उत्सव; कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतीयुक्त सहभाग
1 min read

हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात योगसाधनेचा उत्सव; कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतीयुक्त सहभाग

Loading

हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात योगसाधनेचा उत्सव; कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतीयुक्त सहभाग

ब्राम्हणवेल (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. २१ जून २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल (ता. साक्री, जि. धुळे) येथे योग, प्राणायाम व सूर्यनमस्कारांच्या विविध उपक्रमांनी परिपूर्ण असा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, नागझिरी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. नाईक सर, विषय शिक्षक पाटील सर, प्रभारी मुख्याध्यापक श्री. के. एन. माळी, कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. बी. एस. निकुंभ, लिपिक श्री. चेतन महाजन, श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

पहाटे सात वाजल्यापासून शालेय भव्य पटांगणात हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात योगसाधनेला सुरुवात झाली. क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी प्रार्थना, श्लोक गायन आणि प्राणायामाचे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब माळी यांनी नियमित व्यायाम, योग आणि प्राणायामामुळे वयाच्या ७५ व्या वर्षीही उत्तम आरोग्य लाभल्याचा स्वतःचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवामुळे विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजले.

केंद्रप्रमुख मा. नाईक सर यांनी अध्यक्षांच्या निरोगी जीवनशैलीचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. नियमित योगाभ्यास व प्राणायामाद्वारे शरीर आणि मन सुदृढ ठेवण्याचा संकल्प सर्वांनी यावेळी केला.

कार्यक्रमानंतर संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *