“निरोगी शरीर, सुदृढ मन”चा संदेश; सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
![]()
“निरोगी शरीर, सुदृढ मन”चा संदेश; सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
अमळनेर (प्रतिनिधी):
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी खास योग शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने जसे की सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच योग्य पद्धतीने योग कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. शिक्षकांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्वही समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी योगाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना दररोज योग करण्याचा संदेश दिला.


