महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
1 min read

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Loading

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत राहते तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
यानंतर स्काऊट शिक्षक एस. के. महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्राणायाम करून घेतले. त्यांनी प्रत्येक योगासनाचे फायदे समजावून सांगत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने योगासनांमध्ये सहभाग घेतला.

या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आय. आर. महाजन तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी लिपीक देवेश पाटील व संभाजी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत योगाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
योग करा, निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *