योगातून निरोगी समाजाचा संकल्प; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमांची मेजवानी  बदलापूरमध्ये विद्यार्थ्यांसमवेत योगाभ्यास, तर खोपोली येथे २०० नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्त व हृदय तपासणीचे आयोजन
1 min read

योगातून निरोगी समाजाचा संकल्प; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमांची मेजवानी बदलापूरमध्ये विद्यार्थ्यांसमवेत योगाभ्यास, तर खोपोली येथे २०० नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्त व हृदय तपासणीचे आयोजन

Loading

योगातून निरोगी समाजाचा संकल्प; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमांची मेजवानी

बदलापूरमध्ये विद्यार्थ्यांसमवेत योगाभ्यास, तर खोपोली येथे २०० नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्त व हृदय तपासणीचे आयोजन

बदलापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वतीने बदलापूर परिसरात विविध आरोग्यवर्धक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. योगाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवभक्त-सिंड्रेला हायस्कूल, बदलापूर येथे विद्यार्थ्यांसमवेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
तसेच माधवबाग, खोपोली येथे बदलापूरमधील सुमारे २०० नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, हृदय तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक सल्ला नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला. योग दिनाच्या निमित्ताने आरोग्याबाबत जनजागृती घडवून आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
कार्यक्रमादरम्यान उपचारांमुळे हृदयविकारातून पूर्णपणे बरे झालेल्या नागरिकांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली व निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.

या प्रसंगी डॉ. अमित पाटील, डॉ. सरदार, अनंत जावळेकर, दिलीप म्हसे, अर्चना सुरडकर, श्रीमती कदम मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमधून “योग, आरोग्य आणि जनसेवा” यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *