“योगातून निरोगीपणाचा मंत्र; पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात”
![]()
“योगातून निरोगीपणाचा मंत्र; पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात”
अमळनेर प्रतिनिधी
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योग दिवस योगासने करीत व त्यांचे महत्त्वपूर्ण उपयोगिता विशद करून आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
21 जून हा दिवस जागतिक स्तरावर योग दिवस म्हणून आपण समस्त भारतीय योगासने करीत व त्याचे महत्त्व विशद करीत सोबत त्याचे मानवी जीवनात होणारी उपयोगिता, मानवी जीवन निरोगी सशक्त व प्रबल बनत असते. त्या योगाद्वारे आपले आचार विचार सशक्त प्रबळ निडर व अर्थपूर्ण स्वरूपाचे बनत असतात. या दिवसाचे उपयोगिता व महत्त्वपूर्ण कार्य समस्त विश्वाला कळावे. त्याचा प्रचार व प्रसार समस्त जगामध्ये व्हावा याच महान उदात्त हेतूने योगासने याची कार्यशाळा दिनांक २१.०६.२०२६, रविवार रोजी पी. बी. ए. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग म्हणून नोंदविला होता. शाळेच्या सकाळच्या मंगल प्रहरी समस्त प्रांगणामध्ये समस्त विद्यार्थ्यानी भुजंगासन, ताडासन, वज्रासन, शवासन, सूर्यनमस्कार, मयूरासन नानाविध स्वरूपाचे योगासने करून त्याची प्रात्यक्षिके सादर केली. योगासनामुळे शरीर सशक्त होते. अभ्यास आठवण्यास तसेच चिंतन, मनन करण्यासाठी यांचा सकारात्मक उपयोग होतो. आचार विचार व्यवहार प्रबल व अचूक स्वरूपात असतात. निर्णयक्षमता सकारात्मक बनते. असे बहुआयामी उपयोगिता आपल्याला याद्वारा प्राप्त होते. सदर योग प्रात्यक्षिक त्याचे महत्त्वपूर्ण माहिती तसेच मानवी जीवनाला नवसंजीवनी कशाप्रकारे प्राप्त होते याबद्दलचे सखोल ज्ञान योगाचार्य क्रीडा शिक्षक महेश माळी यांनी विशद केले. पतंजली संस्था हरिद्वार या संस्थेमधील योगाचार्य रामदेवजी बाबा यांचे परमशिष्य श्री गजानन माळी यांनी योगासने व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले.
सदर कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान सर्वतोपरी सहाय्यक शाळेचे चेअरमन डॉ. श्री. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, रोहन मुंदडा, व्ही.पी. बडावे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, सविता सोनवणे, समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंद वर्ग यांचे लाभले.
धन्यवाद.

