सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी – संजय पाटील
![]()
सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी – संजय पाटील
अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून कथितरित्या वापरण्यात आलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दप्रयोगाचा माजी प्रेसिडेंट शेतकी संघ अमळनेर तथा विद्यमान संचालक, अमळनेर तालुका मराठा समाज मंगल कार्यालय व शेतकी संघ अमळनेर श्री. संजय पुनाजी पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
संजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुनेत्रा पवार या जनतेच्या मताने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी असून त्या महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या सन्मानाचे प्रतीक आहेत. अशा महिला लोकप्रतिनिधींबाबत अवमानकारक भाषा वापरणे ही केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यातील महिलांच्या सन्मानाचा अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे सांगत, काँग्रेस पक्षाने संबंधित वक्तव्याबाबत २४ तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, माफी न मागितल्यास महाराष्ट्रभर काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. “महिलांचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. आम्ही मा. श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असेही संजय पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
शेवटी त्यांनी काँग्रेसच्या कथित महिला विरोधी मानसिकतेचा निषेध व्यक्त करत संबंधित वक्तव्याचा जाहीर धिक्कार केला आहे.

