करुणा क्लब संघटक शिक्षकांची उद्या अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक
![]()
करुणा क्लब संघटक शिक्षकांची उद्या अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक
अमळनेर प्रतिनिधी : करुणा आंतरराष्ट्रीय केंद्र, चेन्नई यांच्या वतीने करुणा क्लब संघटक शिक्षक व शिक्षिकांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस करुणा आंतरराष्ट्रीय केंद्र, चेन्नई यांचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. भूपेश चारण उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. करुणा क्लबच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा तसेच पुढील नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे.
करुणा क्लब जिल्हा प्रमुख समन्वयक श्री. दिनेश पालवे आणि अमळनेर तालुका करुणा क्लब समन्वयक श्री. गोकुळ बोरसे यांनी सर्व करुणा संघटक शिक्षक, शिक्षिका तसेच मुख्याध्यापकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी किमान दोन शिक्षक प्रतिनिधींना या बैठकीस पाठवावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. करुणा क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– जय करुणा

