परिश्रम मतिमंद निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
![]()
परिश्रम मतिमंद निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते – मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी :
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचे महत्त्व सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, मानसिक एकाग्रता वाढते तसेच तणावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत दररोज योग करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने व प्राणायाम केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून योग दिनाचा उपक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

