शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा
![]()
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा
अमळनेर प्रतिनिधी
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे युवासेनेतर्फे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेची जनसेवेची परंपरा आणि हिंदुत्वाची विचारधारा अधिक बळकट करण्याचा संकल्प सर्व युवा सैनिकांनी केला.
शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारी संघटना असून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक सामान्य रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास लाखो युवकांसाठी आदर्श असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना लोकसभा संपर्कप्रमुख निखिलजी चौधरी, जिल्हाप्रमुख युवासेना रोहितजी कोगटा तसेच शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात अमळनेर युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर, युवासेना शहरप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख जयेशजी चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख सनीजी चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख तुषार सोनार, युवासेना शहर संघटक पंकज अरुण चौधरी तसेच शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख यश विलास हापसे यांनी हा उपक्रम व कार्यक्रम हाती घेतला
कार्यक्रमास अमळनेर नगरपरिषद शिवसेना शहरप्रमुख भरतजी पवार, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, गटनेते व नगरसेवक पंकजजी चौधरी, अमळनेर नगरपरिषदेचे प्रतोद व नगरसेवक नाविदजी शेख तसेच नगरसेवक दीपकजी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या गौरवशाली ६० वर्षांच्या वाटचालीचा गौरव करत संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जय महाराष्ट्र! जय शिवसेना!


