जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे अमळनेर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद व NEET परिक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन
1 min read

जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे अमळनेर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद व NEET परिक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन

Loading

जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे अमळनेर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद व NEET परिक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर जि. जळगाव येथे जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या वतीने मा. राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव मा. शाम्भवी शुक्ला जी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षा तथा मिरा-भायंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या मा. आफरीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मा.प्रदीपराव पवार होते. NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला तसेच लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश दगडु पाटील यांनी प्रास्ताविक केले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव आशुतोष पवार, किरण पाटील, तुषार संदानशिव यांनी सुरूवातीला युवक काँग्रेसचे भविष्यातील कार्यक्रमांबद्दल माहिती दिली . जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मा. मनोज पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ता मा. संदीप घोरपडे , जेष्ठ नेते मा. देवेंद्र पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष मा. बी.के. सुर्यवंशी, शहराध्यक्ष मा. गजेंद्र साळुंखे, अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव मा. रज्जाक शेख , मौर्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सेवादल तालुकाध्यक्ष मा. बन्सीलाल भागवत गुरूजी, मा.मगन भाऊसाहेब पाटील, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष मा. रावसाहेब पवार, युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष मा.सईद तेली यांनी देखील युवकांना मार्गदर्शन केले. यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC ) ने राबविलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या सर्व फ्रंटल व सेलच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करून अभिनंदन व सन्मान करण्यात आला यावेळी सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत, सेवादल शहराध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील, ओ.बी.सी. सेल शहराध्यक्ष राकेश पवार, अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष भगवान संदानशिव , आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष राजु भाट, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, सोशल मिडीया शहराध्यक्ष संदीप बारी आदी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
बैठकी नंतर NEET परिक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात मराठा मंगल कार्यालय ते तहसिलदार कार्यालय पदयात्रा काढून उपविभागीय अधिकारी श्री मयुर भंगाळे व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले , या निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात आला तसेच NEET पेपरफुटीची निष्पक्ष चौकसीसाठी मागणी करण्यात आली व येत्या 21 तारखेला NEET परिक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे बाहेरगावी परीक्षाकेंद्रे आहेत अशा विद्यार्थ्यांना व पालकांना परिक्षेचे प्रवेश पत्र पाहून मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावी ही मागणी यावेळी करण्यात आली.
या बैठकीसाठी व आंदोलनासाठी चाळीसगाव विधानसभा अध्यक्ष प्रज्वल राजपूत, पाचोरा विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, अमळनेर विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा सरचिटणीस गौरव देशमुख, जिल्हा सचिव शुभम शिंदे, चोपडा शहराध्यक्ष माजित तडवी , भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, योगेश येवले,धरणगाव युवक काँग्रेस शहराध्यक्ष भुषण भागवत,अमळनेर युवक शहराध्यक्ष तौसिफ तेली, धरणगाव युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष गौरवसिंह चव्हाण, काँग्रेस माजी जिल्हा सरचिटणीस प्रा.विश्वनाथ ठाकरे , जेष्ठ नेते तुकाराम चौधरी, जेष्ठ नेते शरद पाटील, गुलाब पाटील , रऊफ पठाण, जितेंद्र चौधरी, मयुर पाटील, प्रशांत पाटील, संदीप बोरसे, चेतन पाटील, वैभव पाटील, जनार्दन पाटील कैलास पाटील, पंकज पाटील, सुनिल पाटील, अर्जुन शिंदे, सुरज पवार , राकेश जाधव, पवन जाधव,मधुकर बडगुजर, मधुकर पाटील, जिवन पाटील, हिमांशू पाटील, अतुल धनगर, राहुल राजपुत, संकेत पाटील, अजय मालचे, सलमान शेख , तौसिफ बागवान ,जयेश कोळी, कुणाल पाटील , बापुजी पाटील, आप्पा पाटील , कुणाल बडगुजर, तेजस ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी तर गौरव देशमुख यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, तालुकाध्यक्ष बी.के. सुर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, शरद पाटील, राकेश पवार यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *