लोकसंपर्काचे जिवंत उदाहरण असलेल्या रवी भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा,  भालेरावनगर-पाटीलगढी परिसरात नागरिकांकडून अभिष्टचिंतन; सेवाभावी कार्याचा गौरव
1 min read

लोकसंपर्काचे जिवंत उदाहरण असलेल्या रवी भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा, भालेरावनगर-पाटीलगढी परिसरात नागरिकांकडून अभिष्टचिंतन; सेवाभावी कार्याचा गौरव

Loading

लोकसंपर्काचे जिवंत उदाहरण असलेल्या रवी भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा

भालेरावनगर-पाटीलगढी परिसरात नागरिकांकडून अभिष्टचिंतन; सेवाभावी कार्याचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील भालेरावनगर व पाटीलगढी परिसराचे लोकप्रिय समाजसेवक तथा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारे श्री. विश्वनाथ पितांबर पाटील (रवी भाऊ) यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा दि. १४ जून रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला.
प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रवी भाऊंप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. यावेळी कॉलनीतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांत नागरिकांनी एकत्र येत नियोजनबद्ध पद्धतीने हा सोहळा यशस्वी करून परिसरातील एकीचे दर्शन घडवले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब संदीप पाटील, ॲड. दिनेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून रवी भाऊंच्या कार्याचा गौरव केला.
“रवी बापू म्हणजे चालते-बोलते सीसीटीव्ही आहेत. संपूर्ण प्रभागावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. काम करणे हीच त्यांची खरी ओळख आहे,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला.

स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, गटारी, रस्ते यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांबाबत रवी भाऊ नेहमीच जागरूक राहतात. दीन-दुबळ्या आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणारा त्यांचा सेवाभावी स्वभाव, विनम्रता आणि हसमुख व्यक्तिमत्त्व यामुळे ते प्रभागातील प्रत्येक कुटुंबाचे “आपले माणूस” बनले आहेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर तसेच चाणक्यनीतीतील प्रेरणादायी विचारांचा उल्लेख करत रवी भाऊंच्या सामाजिक कार्याशी त्यांचा सुंदर मेळ घालण्यात आला.
यावेळी नगरसेवक महेश देशमुख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, विलास पाटील, व्ही. ए. पाटील, गुलाबराव बोरसे, विनोद वैद्य, एम. ए. पाटील सर, प्राचार्य अनिल दुसाने, रामचंद्र उपासनी, प्रवीण पाटील, किशोर पाटील, संजय गोडसे, भूषण शिंपी, रवि पाटील, वाघ सर, आशुतोष निकम, दिनेश पाटील, विजय पाटील, दयाराम पाटील, सदाशिव पवार, सुनील देवरे यांच्यासह प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

“तुमचे प्रेम हीच माझी खरी ताकद” — रवी भाऊ

सत्काराला उत्तर देताना रवी भाऊ म्हणाले, “माझ्यासाठी सर्व नागरिक समान आहेत. तुम्ही फक्त काम सांगा, ते पूर्ण करण्यासाठी मी सदैव तयार आहे. जनतेशी असलेली बांधिलकी कायम जपणार आहे.”
भालेरावनगरातील खुल्या जागेत मंदिर व सभामंडप उभारणीसाठी नियोजन करण्याचे आवाहन करत त्यांनी या कामासाठी पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. यापूर्वी उपनगराध्यक्ष प्रशांत दादा यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरसेवक महेश देशमुख यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शविल्याचे नमूद केले.

“तुमच्या कॉलनीचे वैशिष्ट्य म्हणजे एकी आणि सामूहिकता. कोणताही कार्यक्रम असो, सर्वजण एकदिलाने उभे राहता. एवढ्या मोठ्या संख्येने माझ्यावर प्रेम व्यक्त करून वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी रवी भाऊंना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेच्या कार्यासाठी अधिक बळ लाभावे, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *