पाडळसरे धरणासाठी निधी, पुनर्वसन व भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करा : जनआंदोलन समिती ,  जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची पाहणी; शेतकरी व विस्थापितांच्या प्रश्नांवर समितीचे निवेदन
1 min read

पाडळसरे धरणासाठी निधी, पुनर्वसन व भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करा : जनआंदोलन समिती , जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची पाहणी; शेतकरी व विस्थापितांच्या प्रश्नांवर समितीचे निवेदन

Loading

पाडळसरे धरणासाठी निधी, पुनर्वसन व भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करा : जनआंदोलन समिती

जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची पाहणी; शेतकरी व विस्थापितांच्या प्रश्नांवर समितीचे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल तापी नदीवर अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाची पाडळसरे येथे पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आलेले असतानां पाडळसरे धरण जनआंदोलन समिती पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन उत्तर महाराष्ट्रातील या प्रमुख प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देऊन गती द्यावी अशी मागणी करीत निवेदन दिले.
निम्न तापी प्रकल्पाची पाडळसरे येथे पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आलेले होते.याप्रसंगी त्यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेत धरणाची पाहणी केली.त्यानंतर पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, प्रा. सुनिल पाटील,पदाधिकारी रविंद्र पाटील,नगरसेवक प्रताप साळी,प्रा. भरतसिंग परदेशी, आदींनी यावेळी प्रधान सचिव यांना निवेदन देत तापी नदीवर पाडळसरे येथे १९९९ पासून निम्न तापी प्रकल्पाची पायाभरणी झाली असली तरी तत्कालीन राजकीय अनास्था, अपुरा निधी आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा प्रकल्प तब्बल अडीच दशकांपासून कासव गतीमुळे रखडलेला आहे. धरणाच्या प्रस्तावित लाभक्षेत्रातील परिसर वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असून धरणाच्या कामाला प्रशासनाने प्राधान्यक्रम द्यावा.धरणात लवकर पाणी अडवायला हवे यासाठी बांधकामासह पुनर्वसनाचे कामही गतीने पूर्ण व्हावे असे यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.डवले यांना सांगितले.
शेतकऱ्यांचे व विस्थापितांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटण्यासाठी धरणाच्या साईटवर प्रकल्प कार्यालय झाले पाहिजे. भूसंपादन कामातील अनियमितता असून त्यामुळे प्राप्त होणारा निधी शासनाच्या धोरणानुसार कामात येत नाही.असे यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आधी धरणाचे बांधकाम,भूसंपादन,पुनर्वसन, व उपसा सिंचन योजनेचे काम गतिमानतेने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करीत जलसंपदा विभागातील सचिव पातळीवरील अधिकारी पाडळसरे प्रकल्पाच्या पाहणीसाठी धरणाच्या कामावर प्रथमच आल्यामुळे समितीने श्री.डवले यांचे आभार मानले.याप्रसंगी समितीचे प्रसाद चौधरी, सुशिल भोईटे,गणेश कुंवर, दिपक भोई,ॲड.विजय देवरे, एन के पाटील , ज्ञानेश्वर वारुळे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे अभियंता य म कडलग यांचेसह विभागातील संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे मागील दोन दशकांपासून या प्रश्नावर जनआंदोलन उभे करण्यात आलेले असून सातत्याने संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री व अधिकारी यांच्या संपर्कात राहून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे कार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *