काशिनाथ माळी यांची मुख्याध्यापकपदी निवड व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; मान्यवरांकडून भव्य सत्कार
1 min read

काशिनाथ माळी यांची मुख्याध्यापकपदी निवड व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; मान्यवरांकडून भव्य सत्कार

Loading

काशिनाथ माळी यांची
मुख्याध्यापकपदी निवड व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; मान्यवरांकडून भव्य सत्कार

धुळे प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा कै. बळीराम दादा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल आणि राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीने प्रदान करण्यात आलेला “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६” प्राप्त झाल्याबद्दल संबंधित शिक्षकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तात्यासाहेब विलासराव पाटील, ज्येष्ठ नागरिक आघाडी प्रमुख दादासो. चैत्राम भदाणे, महासंघाचे शहराध्यक्ष हरीशचंद्र रेंडे, कर्मचारी आघाडीचे किशोर माळी गुरुजी, जिल्हाध्यक्ष कर्मचारी आघाडी राजुभाऊ माळी तसेच अनिल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. उपस्थितांनी त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *