टीईटी संदर्भात मोठी घडामोड;  केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून अनिल बोरनारे यांना कॉल
1 min read

टीईटी संदर्भात मोठी घडामोड; केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून अनिल बोरनारे यांना कॉल

Loading

टीईटी संदर्भात मोठी घडामोड;

केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून अनिल बोरनारे यांना कॉल

मुंबई, प्रतिनिधी : देशभरातील शिक्षकांना टीईटी (Teacher Eligibility Test) मधून वगळण्याच्या मागणीसंदर्भात शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला.
केंद्रीय शिक्षणमंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यालयातील OSD (Officer on Special Duty) यांच्यासोबत अनिल बोरनारे यांचा सुमारे १० मिनिटे सविस्तर वार्तालाप झाला. यावेळी देशभरातील कार्यरत शिक्षकांना टीईटीच्या अटीतून वगळण्याबाबत शिक्षक महासंघाने मांडलेली भूमिका आणि शिक्षकांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
अनिल बोरनारे यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना टीईटीची अट लागू करणे अन्यायकारक असून, या विषयावर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक महासंघाकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीसंदर्भात संघटनेकडून विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयाकडून झालेला हा संपर्क शिक्षकांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे द्योतक असल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. या चर्चेनंतर शिक्षकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *