खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन
1 min read

खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन

Loading

खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन

अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व समाजप्रबोधक परमपूज्य सानेगुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. “खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अपार” हा मानवतेचा संदेश देणारे गीत सामूहिकरित्या सादर करून उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी मनुभाऊ दीक्षित, जे. एल. पाटील, राजेश बिर्‍हाडेप्रवीण पुरकर उपस्थित होते.

यावेळी सानेगुरुजी यांच्या राष्ट्रसेवा, साहित्य योगदान आणि मानवतावादी विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *