टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन ,  विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
1 min read

टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन , विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

Loading

“टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन”

विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी :
साने गुरुजी कन्या हायस्कूल व नुतन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता आणि साहित्याची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. दादासाहेब संदीप घोरपडे होते, तर जय योगेश्वर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. लीलाधर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नुतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील, साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. अध्यक्षांचा सत्कार मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी, तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्रीमती अनिता बोरसे यांनी केला.

प्रास्ताविकात श्री. सुनील पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा आढावा घेत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे डॉ. लीलाधर पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा परिचय करून देताना त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचे प्रभावी विवेचन केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. दादासाहेब घोरपडे यांनी अण्णाभाऊ साठे हे केवळ महान साहित्यिक नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी झटणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे उदाहरणांसह सांगितले. आभार प्रदर्शनात श्रीमती अनिता बोरसे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील विविध प्रसंगांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले.

दुसऱ्या सत्रात साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीमती अनिता बोरसे होत्या. डी. आर. महाजन यांनी प्रास्ताविकातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. हर्षिता भामरे (इ. ८ वी अ), किंजल भोई (इ. ८ वी ब) आणि कृतिका पाटील (इ. ९ वी ब) यांनी प्रभावी मनोगते सादर केली. शिक्षकांमधून दिलीप पाटीलआर. एम. देशमुख यांनीही विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात श्रीमती अनिता बोरसे यांनी जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट करत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हिताक्षी भदाणे आणि कल्याणी शिंदे या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि वाचन संस्कृतीची प्रेरणा जागविणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *